भारतीय राजकीय व्यवस्था
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रमावर आधारित ङ्गभारतीय राजकीय व्यवस्थाफ हे पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून त्यांना सहज समजेल अशा भाषेत प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. प्रतिनिधिक लोकशाहीमध्ये निवडणुकांना अतिशय महत्त्व असते. म्हणूनच जगातील सर्वात मोठी लोकशाही राबविणार्या भारतातील निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा आणि निवडणूक आचारसंहितेची माहिती नव मतदारांना मिळावी या उद्देशाने, तसेच घटक राज्याची कार्यपालिका, राज्यविधिमंडळ आणि उच्च न्यायालय यांची रचना, अधिकार व कार्यांसह पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामविकासाचे साधन असलेल्या ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रस्तुत पुस्तकात देण्यात आलेली आहे. यासह संवैधानिक संस्थांच्या वाटचालीचेही विश्लेषण केले आहे. त्यामुळे बी.ए. च्या विद्यार्थ्यांसह, संशोधक तसेच स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे हे पुस्तक आहे.