स्त्री उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गतकालीन अनेक समाजसुधारक आणि वर्तमानातील स्त्री-मुक्ती चळवळी यांच्या संघर्षामुळे आज भारतीय महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारक, सकारात्मक बदल घडून येत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, सैनिकी, साहित्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग अस्तित्वाच्या पातळीवर अधोरेखित होत आहे. त्याला कारण ठरले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडलेले हिंदू कोड बिल, भारतीय संविधानात स्त्रियांना पूर्ण अधिकार बहाल करणारे कायदे, स्त्री-पुरुष समता विषयक मुल्य आणि या संविधानिक मूल्यांना अनुसरून स्वातंत्र्योत्तर काळातील आणि आजपर्यंत हे करण्यात आलेले स्त्री-स्वातंत्र्य विषयक विविध कायदे, यामुळेच आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर स्त्री हि पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी आणि प्रगती करीत आहेत. या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय स्त्री उद्धार व विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान विषद करून त्यांच्या स्त्री मुक्तीविषयक चिंतनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामुळे सामाजिक परिवर्तनाला दिशा मिळेल. स्त्री-पुरुष समतामुलक समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी हा ग्रंथ पूरक व मार्गदर्शक ठरेल अशी अशा आहे.