महिला : आरोग्य संवर्धन
स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने काम करते. परंतू आजही कुटुंबात व समाजात स्त्रीचे स्थान कनिष्ठ आहे पुरुष प्रधान समाज व्यवस्था, घरकाम, मुलांचे पालनपोषण, कुटुंबातील लोकांची निगा वृद्वांची सेवा एकूण सदैव कष्ट करणे सतत कामामुळे तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. कमी वयात लग्न आणि गर्भधारणेचा स्त्रियांचा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. त्यामुळे गर्भपात, कमी दिवसाची प्रस्तूती, जोखमीची प्रस्तुती, कमी वजनाचे आपत्य जन्माला येणे इत्यादीबाबी घडतात. त्याचा स्त्रीयांवर तसेच संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. त्यामुळे जीवनाचा आनंद अल्पावधीतच निघून जातो. प्रसुतीमुळे रक्तक्षय अॅनिमिया, गर्भशयाच्या कर्करोग तसेच त्यांची आरोग्यस्थिती गरोदर, गर्भपात किंवा प्रसुती याबाबत मोठया समस्या निर्माण होतात. शिवाय वारंवार गर्भधारणेमुळे स्त्रीला अत्यंत मानसिक तणावातून जावे लागते. त्यामुळे तिचा शारीरीक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. महिला व बालक निकोप आणि सदृढ असेल तर कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासाला हातभार लागतो.