भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची यशोगाथा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ‘भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांची यशोगाथा’ या शीर्षकाखाली लेख मागवून तसेच उपविषयदेखील त्याच अनुषंगाने देऊन लेखांच्या माध्यमातून सार्थक झाल्याचे दिसून येते. छोडो भारत चळवळीत शिरपूर तालुक्यातील जनसामान्यांचा सहभाग, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शिरपूर तालुक्याचे योगदान, पूर्व खानदेशातील भूमिगत चळवळ - एक दृष्टिक्षेप, ब्रिटिश राजवट आणि भारत, ब्रिटिश शासनव्यवस्थेचे भारतावर झालेले परिणाम, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे योगदान, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सरोजिनी नायडू यांचे योगदान, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खानदेशातील आदिवासींचे योगदान, भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि महिलांचा सहभाग., ब्रिटिशकालीन भारतीय समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात आदिवासी समाज सुधारकांचे योगदान, अशा विविध लेखांतून विचार मांडले आहेत. संशोधक आणि वाचकांना निश्चितच याचा लाभ होईल, यात शंका नाही.