मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इतर सर्व विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण सकारात्मक बदल नवीन अभ्यासक्रमामध्ये आहेत. प्रस्तुत अभ्यासक्रमातील दुसर्या वर्षातील ‘मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण’ या विषयासाठी अध्यापक व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोयीचे व्हावे आणि सर्व पाठ्यक्रम एकाच ठिकाणी व एकाच पुस्तकात मिळावा, याद़ृष्टीने अभ्यासक्रमावर आधारित प्रस्तुत ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण आठ प्रकरणे आहेेत. सर्वच प्रकरणे ही मुद्देसूद लिहिण्याचा व साध्या, सरळ भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.