मराठी शिक्षण
प्राध्यापक, अधिव्याख्यातांना मराठी या विषयाचे अध्यापन करण्यासाठी आवश्यक सर्वच घटकांचा विचार सदर पुस्तकात केलेला आहे. सदर पुस्तकात भाषेचा विकास विविध उपपत्ती, भाषा शास्त्रीय विचार पध्दती यांच्या अनुषंगाने कसा होत गेला याविषयीची माहिती दिली आहे. शिवाय मातृभाषा मराठीचे महत्व, तत्वे, उद्दिष्ट्ये, स्थान, संरचना, इतर विषयांशी असणारा समवाय याविषयीही विस्तृत माहिती दिली आहे. मराठी विषयाच्या अध्यापनाची उद्दिष्ट्ये, मुल्य विकास, जीवनकौशल्यांची रुजवणूक, गाभाघटकांची ओळख यासाठी ५ वी ते १० वी च्या मराठी पाठ्यपूस्तकातील उदाहरणांसह विवेचन केले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्ञानरचनावादावर आधारित आधुनिक अध्यापन पध्दती, विविध अध्यापन प्रतिमाने उदाहरणांसहित दिलेली आहेत. यांचा मराठी अध्यापन करतांना शिक्षकाला खुप उपयोग होईल. सद्यास्थितीत शिक्षक तणावग्रस्त असलेला दिसून येतो. या दृष्टीकोनातून मराठी विषय शिक्षकाला मानसिक तणाव येण्याची कारणे व उपाययोजना सविस्तर मांडल्या आहेत.