सामाजिक कायदे
सामाजिक कायदे हे सामाजिक बदलाचे साधन आहे. सामाजिक कायदे समाजातील अपप्रवृत्ती, निषेधार्थ, विघातक व निंदनीय बाबी दूर करण्यासाठी व याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सामाजिक कायदे निर्माण केले जातात. सामाजिक कायद्यामुळे सामाजिक सुधारणा होतात. समाज कल्याण व कल्याणकारी राज्यासाठी सामाजिक कायदे सहाय्यकारी ठरतात. समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासात बाधा उत्पन्न करणार्या सामाजिक समस्यांना दूर करण्याचे काम हे कायदे करतात. सामाजिक अन्याय आणि विघातक प्रवृत्ती नष्ट करणे, समाज विकास साध्य करणे हे सामाजिक कायद्याचे उद्दिष्टे असतात. सामाजिक कायदे समाजातील परिस्थिती, गरज व समाजाचे उद्देश लक्षात घेऊन निर्माण केले जातात. समाजातील राजकीय व्यवस्था त्या त्या समाजातील कायद्याचे स्वास्थ्य ठरवते. कल्याणकारी समाजाला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कायदे सहाय्य करतात. प्रस्तुत पुस्तकातील कायदे संबंधी माहिती सर्वसामान्यांना उपयोगाची असून कायदेविषयक व समाजकार्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, समाजकार्यकर्ते, समाजसेवक, यांना ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.