सामाजिक, आर्थिक संशोधन पद्धती आणि सांख्यिकीय तंत्रे
संशोधन ही आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. संशोधनामध्ये मूर्त-अमूर्त, चल-अचल, दृष्य-अदृृृृष्य अशा घटना व त्याचे परिणाम याविषयी परस्परसंबंध शोधून काढणे व त्याला सांख्यिकीय तत्त्वावर प्रदर्शित करणे या घटकांचा समावेश होतो. संशोधन कार्य हे अतिशय गुुंतागुंतीचे असून त्यातील संकल्पना या सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असतात. त्या दृष्टीने संशोधनाकरिता संशोधनाचे कार्य सुलभ व्हावे व त्यामध्ये क्रमवारपणा यावा या दृष्टीने ‘सामाजिक, आर्थिक संशोधन पद्धती आणि सांख्यिकीय तंत्रे’ या ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे. सामाजिकशास्त्र, नैसर्गिकशास्त्र, साहित्यशास्त्र इत्यादी विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता सामाजिक संशोधन पद्धती व आर्थिक संशोधन पद्धती हे विषय शिकवले जातात. त्याचबरोबर विविध विषयांमध्ये एम. फिल., पीएच. डी. पदवी प्राप्त करणार्या संशोधकांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने महत्त्वपूर्ण संकल्पना सोप्या व सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे.