स्वातंत्र्यलढ्यातील जनयोद्धे (पश्चिम खानदेश सन १८८५-१९४७)
सन १८१८ मध्ये पेशवाईच्या पाडावानंतर भारतावर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू झाला. कंपनी सरकारच्या कारभाराने भारतीय जनता त्रस्त झाली होती. सन १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्याने जनतेची आशा बळावली, तशी मावळली. देश कंगाल बनला. जनमानसांत राष्ट्रीयत्वाची भावना मूळ धरू लागली.
काळानुरुप भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला युगप्रवर्तक नेतृत्व लाभले. थंड गोळ्याला ऊब मिळावी तशी जनतेच्या सुप्तावस्थेतील असंतोषाला वाट मिळाली. सन १८८५ पासून तर संघटितरित्या प्रादेशिक व जिल्हा नेतृत्व पुढे आले. धुळे जिल्ह्यातील जनसमुहाने स्वातंत्र्यसैनिकांना त्याग व बलिदानाच्या भावनेतून भरीव मदत केली. खरोखर, या काळात जनसमूहाच्या सर्वंकष (सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक) योगदानाची नितांत गरज होती. सत्कृत्दर्शनी राष्ट्रीय चळवळ सफल झाली. डॉ. पापालाल पवार यांनी आपल्या संशोधनातून धुळे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणार्या दुर्लक्षित जनसमुदायाचा सर्वस्पर्शी उपयुक्त परिचय करुन दिला.
जयहिंद !
प्राचार्य डॉ. मधुकर विक्रम पाटील