मानवी भूगोल
मानवी भूगोलात सभोवताली पर्यावरणाची परिस्थिती व मानवी जीवन यांचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक पर्यावरणाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, मानवाचे विविध व्यवसाय कोणते, मानवाच्या सामाजिक रूढी व परंपरा कोणत्या या विषयांची माहिती मानवी भूगोलाच्या अभ्यासाने प्राप्त होते. एकंदरीत मानवी भूगोलात मानव व सभोवतालची पर्यावरणाची परिस्थिती या दोघांच्या आंतर क्रियांचा अभ्यास केला जातो. आजच्या आधुनिक काळात मानवी भूगोल ही नवीन विद्या शाखा अतिशय महत्त्वपूर्ण असून जगातील अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी या शाखेत संशोधन केलेले आहे, म्हणून आधुनिक काळात मानवी भूगोल ही शाखा महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रस्तुत पुस्तकात मानवी वंश, भारतातील जमाती, जगातील जमाती, भाषा, धर्म, लोकसंख्या, वस्ती इत्यादी घटकांची विद्यार्थ्यांसाठी साध्या व सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.