ग्रंथवीर
३१ जुलै २०२३ रोजी डॉ. धर्मराज वीर हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवेचा, या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या विद्यापीठातील सहकारी, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे मित्रस्नेही व व्यावसायिक बंधू यांनी त्यांच्या सेवेचा गौरव करावा म्हणून गौरवग्रंथ काढण्याचे निश्चित केले आहे आणि हा गौरवग्रंथ ग्रंथालय- माहितीशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख यासाठी उपयोगी पडेल. या ग्रंथाचे दोन भाग केलेले असून, पहिल्या भागामध्ये वीर सरांच्या व्यक्तिगत जीवनावरील लेख असून, दुसर्या भागामध्ये ग्रंथालयशास्त्रासंबंधित अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश केलेला आहे.