ग्रंथालय व माहितीशास्त्र
‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ अत्यंत उपयुक्त व समाजासाठी अत्यंत आवश्यक असा विषय आहे. ग्रंथालय गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवर कार्यरत असतात. ‘ग्रंथालय’ आता माहितीचे केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. लोकशिक्षणाचे उपयुक्त असे कार्ये ही विविध प्रकारच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे पार पाडली जातात. ग्रंथालयामध्ये आता ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या आहेत. त्यामुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. यासाठी आवश्यक व सुसंस्कृत मनुष्यबळ प्राप्त व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळ व शासन यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा आयोजन तसेच विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे - सेट -राज्य स्तरावरील परीक्षा तसेच नेट- राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्याचे आयोजन होत असते. त्यासाठी एक उपयुक्त मराठी भाषा व इंग्रजी भाषा एकत्रितरित्या करून अभ्यासासाठी माहिती आणि सरावासाठी प्रश्नसंच उत्तरासकट देण्याचा येथे प्रयत्न केला आहे. हे पुस्तक सेट/नेट/नवोदय/केंद्रिय विद्यालयाच्या ग्रंथपाल भरती परीक्षांसाठी पेपर-२ विषयाशी संबंधित आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र याविषयाशी निगडीत माहिती आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश केला आहे. परीक्षार्थीना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध व्हावा एवढाच दृष्टीकोन ठेऊन सदर पुस्तक तयार करण्यात आले आहे.