माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार कायदा - २००५ नुसार नागरिकांना माहिती मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला दिसून येतो. माहितीचा अधिकार म्हणजे लोकांना शासनाची माहिती सुलभपणे उपलब्ध करुन देण्याचा स्वातंत्र्य होय. या शस्त्रांचा वापर करुन जनता व शासनातील असलेली दरी कमी होते. शासनासाठी सुशासन, ई प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना माहितीचा अधिकार कायदा - २००५ ची भूमिका महत्वाची ठरते.
माहिती नेमकी कोणती मागू शकतो? कशी मागवू शकतो त्या ऑनलाईन प्रक्रियाची सुरुवात झालेली दिसून येते. कोणता विभाग तुम्हाला कोणती माहिती देऊ शकतो? ती माहिती किती दिवसात देणे बंधनकारक आहे? या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती अधिकारात प्राप्त होतात. लोक प्रशासनाची एक विद्यार्थी म्हणून माहितीच्या अधिकारात गव्हर्नन्स अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन (प्रशासन) कार्यप्रणाली अंमलात कशी येते, हे जाणून घेणे आवश्यक वाटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार वापर कसा होतो त्याच माहिती अधिकारामुळे आपल्याला पारदर्शकता प्राप्त होताना दिसून येते.