तुलनात्मक राजकारणाची ओळख
राज्यशास्त्राच्या पारंपरिक सिद्धांतांबरोबर अध्ययनातील नवीन प्रवाह व संकल्पनांची मांडणी या पुस्तकाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यशास्त्राची अत्यंत महत्वाची शाखा मानल्या जाणाऱ्या तुलनात्मक राजकारणाच्या सिद्धांत व मुल्यांची विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न 'तुलनात्मक राजकारणाची सैद्धांतिक ओळख' या पुस्तकात करण्यात आला आहे. पदवी व पदव्युत्तर स्तरावरच नव्हे तर नेट, सेट, पेट आणि अन्य स्वरूपाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित तुलनात्मक राज्यशास्त्र विषयाच्या महत्वाच्या संकल्पनांवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. आज अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडत आहेत त्यामुळे साहजिकच त्यांची रुची राज्यशास्त्र विषयात वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे वाचकांमध्ये राज्यशास्त्र व त्याच्या विविध शाखांविषयी सखोल माहिती व्हावी, राज्यशास्त्राच्या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत प्रस्तुत पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.