आदिवासी पावरा संस्कृतीनं जीवणो
पावरा जमातीची वस्ती स्थाने प्रामुख्याने सातपुड्याच्या पर्वताच्या रांगांमध्ये आढळतात. या जमातीचे जीवणो (जीवनशैली) आगळीवेगळी असून सदर पुस्तकात लेखकाने पावरा लोकांच्या जीवनातील संघर्ष, प्राकृतिक रचनेशी समरुप असणारा समाज, सांस्कृतिक रचनेच्या आधारे स्वशासन व्यवस्था, लग्नविधी, मृत्यूविधी, सामाजिक कार्य, सण उत्सव महोत्सव, वाद्य, निसर्ग दैवत, प्रथा, परंपरा, रिवाज, या घटकानुरुप सखोल माहिती पुस्तकाच्या माध्यमातून लेखन करून पावरा समाजाचे खरे अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आदिवासी पावरा जमातीच्या जीवन जगण्याच्या पध्दती किंवा जीवनशैलीचे महत्व अधोरेखीत करून या पुस्तकाच्या माध्यमातून सांस्कृतिक एकता, संघटन, शिक्षण, कला कौशल्य, आख्यायिका, पुडू, लोक इतिहास, लोककथा, नैसर्गिक साधन सामुग्री, निसर्ग दैवत, रचना, ध्येय, जिद्द, इत्यादी मुद्यांच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला, समाजाला, वाचक व संशोधकांना माहिती मिळावी, पावरा समाजाची स्वशासन व्यवस्था व समुहरचनेची पारंपरिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तथा प्रस्थापित करण्याच्या हेतूने ‘आदिवासी पावरा संस्कृतीन जीवणो’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.