प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा
प्राचीन काळापासून आपला भारत देश उच्च मानवी मूल्यांचा आणि विशिष्ट वैज्ञानिक परंपरांचा देश आहे. प्राचीन भारताने तत्त्वज्ञान, ध्वन्यात्मक भाषाशास्त्र, कर्मकांड, व्याकरण, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, सांख्य सिद्धांत, तर्कशास्त्र, जीवन विज्ञान, आयुर्वेद, ज्योतिष आणि संगीत यासारख्या विविध मानवी कल्याणाच्या क्षेत्रात नोंदी करून मानवजातीच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. जग भारताच्या परंपरा स्वीकारत आहे. आपल्याला आणि आपल्या भावी पिढ्यांनाही भारताच्या प्राचीन मूल्यांना योग्य महत्त्व द्यावे लागेल. त्यासाठी आंतरिक ज्ञान, गुण, सामर्थ्य आणि आदर्श यांची योग्य ओळख करून योग्य दिशा देण्याची आज गरज आहे.