सातपुड्यातील आदिवासी संस्कृती
‘सातपुड्यातील आदिवासी संस्कृती’ प्रस्तुत ग्रंथ म्हणजे सातपुड्यातील आदिवासी संस्कृती, इतिहास एवढ्यापुरते सिमीत नसून संबंध आदिवासी जमातींच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या सांस्कृतिक परंपरेचा लेखाजोखा म्हणता येईल. कारण थोड्या अधिक फरकाने त्यांच्या रितीरिवाज-परंपरा-सण-उत्सव निसर्गदेवता एकसमान आहे. म्हणजेच पुर्या आदिवासींचे एक प्रतिनिधित्व स्वरूपातील हा ग्रंथ होऊ शकतो. सातपुड्यातील आदिवासींची पार्श्वभूमी वाचताना भौगोलिकता, स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून संस्थानिकांच्या राजवटीपर्यंत इतिहास समजतो, सातपुड्याची भौगोलकिता हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतो. (मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र भूप्रदेश पाहता जेथे सह्याद्री संपतो तेथून सातपुडा सुरू होतो. नर्मदा नदीचा पलिकडील तीर विंद्याची आहे.)