लेखन व संभाषण कौशल्य
मानवी जीवनात सर्वांगीण विकासात संवादाचे फार मोठे स्थान राहिलेले आहे. संवाद हा कायिक, वाचिक व ग्रांथिक माध्यमातून होऊ शकतो. सर्वसामान्य मानवी व्यवहारात आपण अहर्निशपणे कायिक आणि वाचिक संवादाचे उपयोजन करीत असतोच. संवाद हा आपला जीवन व्यवहारच असतो. या संवादाचे स्वरूप अनौपचारिक असते. परंतु आपण एखाद्या औपचारिक क्षेत्रात वावरत असतो तेथे संवादाचे स्वरूपही आपल्याला औपचारिकच ठेवावे लागते. अशा वेळेस व्यक्तीला आपल्या अनौपचारिक संवाद कौशल्यांना औपचारिक कौशल्यांच्या पातळीवर आणावे लागते. औपचारिक संवाद प्रक्रियेमध्ये आपली कौशल्ये ही सफाईदार आणि नेमकेपणाने वापरायची असतात. संवाद कौशल्ये व लेखन कौशल्य हा मानवी व्यवहाराचा एक अविभाज्य भाग असल्याने या कौशल्यांचा विद्यार्थ्यांना सार्वजनिक जीवनातही चांगल्या रीतीने उपयोग करता यावा या उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे.