उपयोजित संख्यात्मक अर्थशास्त्र
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठात सांख्यिकी हा विषय शिकविला जात असून नवीन शैक्षणिक धोरण (२०२०) नुसार, प्रस्तुत ग्रंथात अद्यावत अभ्यासक्रमाचा समावेश केला आहेे. आज संगणकाच्या वेगवान युगात जवळपास सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनाचे व अनिश्चित परिस्थितीत निर्णय घेण्याचे अत्यंत प्रभावी साधन ठरते. म्हणून सांख्यिकीचे महत्व व उपयोगिता याबाबत वॉलिस आणि रॉबर्ट्स यांनी आधुनिक सांख्यिकीला ‘मानवी कल्याणाचे गणित’ असे म्हटले. म्हणून सांख्यिकीय अभ्यासाचे वाढते महत्त्व व बदलत्या काळात नवीन संकल्पना व बदलते प्रवाह लक्षात घेता सदरग्रंथाची निर्मिती विस्तृत व व्यापक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न सदर ग्रंथात करण्यात आला आहे.
अर्थशास्त्राचे विद्यार्थी व त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सांख्यिकीय समस्यांची जाणीव लक्षात घेऊन या विषयात आवड निर्माण व्हावी, विषयाचे सहज आकलन व्हावे हा त्यामागील हेतू होय. करिता, विविध सांख्यिकीय संकल्पना, चाचण्या, समीकरण व संख्यात्मक उदाहरणासह मांडणी करण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी वर्गातील, सेट-नेट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी, सांख्यिकीय अर्थशास्त्राचा अधिक सखोल अभ्यास करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विस्तृत रीतीने हाताळण्यात आला आहे. या विषयाचे महत्त्व शिक्षक, सामान्य लोक, संशोधक, विविध शाखेतील अभ्यासक, विश्लेषक व विद्यार्थ्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.