भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे आणि महाराष्ट्र प्रशासन
'भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे आणि महाराष्ट्र प्रशासन' ह्या पुस्तकाचे लेखन करताना भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्र प्रशासनाची सर्वांगीण स्वरूपाची माहिती अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी हा प्रमुख उद्देश आहे.
या पुस्तकाची रचना एकूण आठ प्रकरणात केलेली आहे. पहिल्या प्रकरणात भारतीय संविधानाची पार्श्वभूमीविषयक माहिती समाविष्ठ आहेत तर प्रकरण दोन ते चारमध्ये मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे, आणीबाणीच्या तरतूदी, घटना दुरूस्ती आणि मागास प्रवर्गासाठी विशेष घटनात्मक तरतूदी विषयक माहितीचा सद्यकालीन स्थितीचा विचार करून समावेश केलेला आहे. पाचव्या प्रकरणात महाराष्ट्रातील ओळख प्रकरणात महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, भौगौलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊन राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये व रचनाविषयी माहिती दिलेली आहे. सहाव्या प्रकरणात सचिवालय आणि संचालनालयाबद्दल माहिती समाविष्ट आहे तर सातव्या प्रकरण जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी आणि आठवे प्रकरणात कायदा व सुव्यवस्थाबाबत माहिती विशद केलेली आहे.महाराष्ट्रातील निरनिराळ्या विद्यापीठात हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच UPSC, MPSC, NET/SET परीक्षेतील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहे. म्हणून उपरोक्त पुस्तक विद्यापीठीय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षा या दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.