मूलभूत मानसशास्त्र
प्रस्तुत पुस्तक लिहिताना सर्वसामान्य अशा पारिभाषिक शब्दांची योजना केलेली असून इंग्रजी शब्दांना अनुरूप असणारे मराठी भाषेतील अनेक पर्यायी शब्द उपयोगात आणल्यामुळे पुस्तक साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध करणे शक्य झाले. पुस्तकातील प्रकरणांची क्रमवार रचना करून व सोपी भाषा वापरून ओघवतेपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानसशास्त्राची ओळख, वर्तनाचे जैविक आधार, व्यक्तिमत्त्व, प्रेरणा आणि भावना, अशी प्रकरणांची मांडणी असून प्रत्येक प्रकरणात जवळपास सर्व उपघटकांना उदाहरणे देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक प्रकरणातील शेवटच्या उपघटकात मानसशास्त्रीय उपयोजन म्हणून काही उपयुक्त मुद्यांची चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांना व याचकांना याचा निश्चितच फायदा होईल यात शंकाच नाही.