भारतीय नागरी सेवा
राज्यशास्त्र विषयाची ज्ञानशाखा दिवसेंदिवस विस्तारत आहे. त्यात ‘नागीसेवा’या घटकाला विशेष महत्त्व आहे. या पुस्तकातून आजच्या युवकांना भावी जीवनात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन सनदी सेवेत प्रवेशाबाबतचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. पदवीला प्रवेशित झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे स्वप्न असते. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तकात नागरी सेवेचा अर्थ, नागरी सेवेची कार्ये, महत्त्व, नागरी सेवेचा विकास, भरती, तिचे प्रकार, पद्धती, पद्धती, केंद्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग या नागरी सेवा उपलब्ध करून देणार्या आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा पद्धती, त्यात होणारे बदल, अभ्यासक्रम या मुद्यांची अद्ययावत माहिती व संकल्पनांचा समावेश केला आहे.