वारली समाज धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रथा आणि परंपरा
प्रस्तुत पुस्तकात वारली समाजातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रथा आणि परंपरा यासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वारली समाजातील धार्मिक विधी इतर आदिवासी समाजात देखील केल्या जातात. त्यांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. सदर पुसतक हे आदिवासींच्या खासकरून पालघर, नाशिक, दादरा-नगर-हवेली परिसरातील वारली, कोकण कातकरी,धोडी ठाकुर जमातीबाबत माहिती देते. लेखकाने यामध्ये वारली समाजाबरोबर इतर समाजांतील प्रथा मांडल्या आहेत; जसे हिरवादेवाची पूजा इतर समाजांमध्ये होते. आदिवासी जमातीच्या प्रथा परंपरांची मांडणी पुस्तकात केली आहे. आदिवासी जीवनाचा अभ्यास करताना हे पुस्तक अभ्यासकांना नक्कीच उपयुक्त होईल.