व्यक्तिमत्वाचे सिद्धांत
सर्वसाधारण व्यक्ती व्यक्तिमत्त्वाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावते. वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या कल्पना वेगवेगळ्या आढळतात. त्यात काही समज आणि अपसमजांचा भाग जास्त असतो. मानसशास्राचा विद्यार्थी या नात्याने व्यक्तिमत्त्वासंबंधी अपसमज कोणते असू शकतात? याची माहिती झाल्यास व्यक्तिमत्त्वाचा मानसशास्रीय दृष्टीने लावला जाणारा अर्थ आकलन होण्यास मदत होते. ‘व्यक्तिमत्त्व’ या शब्दाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची निर्धारके जाणून घेणे अत्यावश्यक आहेत.