आशय आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास : गणित
विद्यापीठाने लागू केलेल्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार व वार्षिक परीक्षा (Yearly Pattern) पद्धतीनुसार बी.एड. अभ्यासक्रमासाठीचे आशय आणि अध्यापन शास्त्रीय- गणित’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. बी.एड्. च्या अभ्यासक्रमानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकात आशय ज्ञानालाही स्वतंत्र प्रकरण रचना असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना सदर पुस्तक अभ्यासासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. तसेच ‘गणित’ या अध्यापन पद्धतीचा जास्तीचा अभ्यास करणार्यांसाठी सदरचे पुस्तक एक दिशादर्शक ठरू शकते.