विज्ञान आशययुक्त अध्यापन पद्धती भाग १
विज्ञान हा विषय शालेय स्तरावर अनिर्वाय विषय आहे. मुदलियार आयोग व कोठारी आयोगाने शिक्षण क्षेत्रात विज्ञानाचे अध्यापनातील स्थान अधोरेखित केले आहे. प्रयेक व्यक्तीच्या दृष्टीने विज्ञानाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण ठरतो. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक, सामाजिक विकासाच्या दृष्टीने विज्ञान उपयोगी ठरत असते. विज्ञान हा मानवाच्या जीवनांतील एक अविभाज्य घटक झाला आहे. म्हणूनच विज्ञानाच्या अध्यापनातून एक चांगला सुजाण नागरिक घडावा तसेच स्वतःबरोबर राष्ट्राचा विकास व्हावा यासाठी विज्ञानाचे अध्यापन अधिकाधिक परिणामकारक होणे अत्यंत आवश्यक आहे.