युद्धतंत्राची उत्क्रांती व कारणे
अतिप्राचीन काळापासून मनुष्य प्राणी युद्ध करीत आला आहे. म्हणजेच युद्ध प्रवृत्ती ही माणसामध्ये पूर्वीपासूनच आहे आणि आजही तो युद्ध करीतच आहे. मानवी इतिहासाच्या या अतिविस्तृत कालखंडामध्ये मानवी जीवन सर्वप्रकारे म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व तांत्रिक इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आज संपूर्ण मानव जात जणू एक झालेली आहे. असे असतानासुद्धा जगात कुठे ना कुठे युद्ध हे होतच आहे. याचे कारण काय? मानवजातीत अशी कोणती विकृती आहे की, जी मानवाला युद्ध करण्याची प्रेरणा देते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित अशी कारणे हाती येऊ शकत नाहीत. तरीसुद्धा गतकाळाचे सूक्ष्म अवलोकन केल्यास व त्यातल्या त्यात मानवजातीचा अभ्यास केल्यास वरील प्रश्नाचे उत्तर सापडणे शक्य आहे.गत इतिहासातील प्रत्येक कालखंडामध्ये जी युद्धे झालेली आहेत, त्या सर्व युद्धाचे मूळ (जीळसळप) व कारणे (उर्रीीशी) सापडू शकतील, तसेच त्यामागची प्रेरणासुद्धा समजू शकेल. या सर्वांच्या आधारे भविष्यकाळातील युद्धे कशा प्रकारची असतील वा कशा प्रकारे खेळली जातील, याचा अंदाज आपल्याला करता येईल. मधल्या काळात अनेक विचारवंतांनी युद्धापासून होणारे भयंकर परिणाम पाहून मानवजातीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यासाठी जागतिक शांततेवर भर दिला. त्यामध्ये काही धर्म-पंथ होते, तर काही व्यक्ती होत्या.दोन राष्ट्रे किंवा राष्ट्रसमूहांमध्ये शस्त्रबळाच्या सहाय्याने झालेला संघर्ष म्हणजेच युद्ध होय, अशी व्यवहारी व सुटसुटीत व्याख्या करता येईल. पूर्वी युद्धांमध्ये वेळेचे व काळाचे बंधन नव्हते, म्हणजेच अशा प्रकारची युद्धे काळाच्या दृष्टीने मर्यादित राहिली नाहीत. कारण, इतिहासामध्ये १०० वर्षे चाललेली युद्धेे, ७ वर्षे चाललेली युद्धे अशा नोंदी आढळतात.