भारतीय राज्यघटना आणि आदिवासी समाज
आदिवासी समाजातील जे थोडेसे जाणकार लाभार्थी आहेत, त्यांच्यात व्यक्तिगत हक्काचे दावे करण्याइतपत प्रवाह उदयास आला आहे खरा; परंतु समाजकर्तव्य आधारित दाव्याऐवजी हक्क आधारित दाव्याची अपेक्षा करण्याइतपतच यांची गती गेलेली आहे. त्यामुळे आदिवासी समाजात समाजजागृतीची पावले पडताना दिसत नाहीत. यशाचे धनी खूप असतात. अपयशाला मात्र वाली कोणीच नसतो. दृश्यस्वरूपात प्रामुख्याने आदिवासी समाजालाच ही बनावट जात दाखलेवाल्यांची घुसखोरीची समस्या फार भेडसावते आहे.