इतिहास - अर्थ व स्वरूप
इतिहास - अर्थ व स्वरूप
इतिहास - अर्थ व स्वरूप
इतिहास - अर्थ व स्वरूप

इतिहास - अर्थ व स्वरूप

  • ISBN : 978-93-91712-22-8
  • Author : डॉ. संतोष दत्तात्रय बोडके
  • Edition : 16 May 2022
  • Weight : 200
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 184
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : इतिहास,संदर्भ पुस्तके,
280 350 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR इतिहास - अर्थ व स्वरूप

ADD A REVIEW

Your Rating

इतिहास - अर्थ व स्वरूप

इतिहासकारांचे विचार, विचारप्रवाह आणि त्याचबरोबर त्यांची वर्तमान व गतकाळाविषयीची व्यापक अर्थाची समजउमज इतिहासातून प्रकट होत असल्याने आत्मप्रकटीकरणाचे, तसेच समाजमन व समाजमत निर्मितीचे प्रभावी माध्यम म्हणून इतिहासाकडे पाहिले जाते. अनेक इतिहासकारांनी दिलेल्या इतिहासाच्या विविध व स्थलकालसापेक्ष व्याख्या हे त्याचे पुरेसे आणि समर्पक असे उदाहरण ठरते. थोडक्यात, इतिहासकार आपल्या परिप्रेक्ष्यातून वर्तमान समाजाला गतकालीन समाजजीवनाची सफर घडवून आणतो. मात्र, उपलब्ध परिस्थितीतील अनेक विचार व विचारप्रवाहांतील आपले विचारदृष्टिकोन हे केवळ आणि केवळ एकच बाजू असून, याव्यतिरिक्तही अनेक साधकबाधक उर्वरित व्यापक व प्रगल्भ दृष्टिकोन अज्ञात आणि दुर्लक्षित राहिलेले आहेत. कदाचित याची जाणीव असूनही तो बर्‍याचदा आपल्या विचारांमध्ये भक्कमपणाची फक्त भरच घालण्याच्या प्रयत्नात असतो. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अनेक वृत्ती, प्रवृत्ती व प्रकृतीच्या व्यक्ती-व्यक्तींनी बनलेल्या समाजजीवनाचे आणि त्यातील विविध समाजगटांचे बहुअंगी व बहुरंगी जीवनचित्र बराच काळ एकाच रंगाच्या काचेतून अनुभवल्यास ते पुढे पुढे स्पष्ट होत जाण्याऐवजी दिवसागणिक धूसर व अंधुक होण्याची अधिक संभावना असते आणि म्हणूनच समाजरूपी निसर्गात उपलब्ध उर्वरित रंगांची तोंडओळख व प्रारंभिक अनुभूती हे प्रस्तुत ग्रंथाचे प्रयोजन असून, इतिहासाचे विविध विचार व दृष्टिकोनांची इतिहासाच्या व्याख्या, स्वरूप व व्याप्तीच्या माध्यमातून कमी-अधिक मात्र मिळतेजुळते इतिहासचित्र रेखाटण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न इतिहासाचे विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी आशाही आहे...


RELATED BOOKS