आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०)
अलीकडच्या १०-१५ वर्षांत परीक्षापद्धतीत झालेले बदल, तसेच सर्वकाही ऑनलाइन ( शिक्षण, संवाद, परिसंवाद, परिषदा, कार्यशाळा, बैठका, भेटीगाठी; एवढेच काय, कोणाचेही दर्शन देव, आई-वडील, भाऊ-बहीण, शिक्षक-विद्यार्थी) झाले. ऑनलाइनचाही कंटाळा आला. डोळे, कान, मन, शरीर इत्यादी ऑनलाइनच राहिले. मात्र, ही पद्धती आता नकोशी वाटत आहे. पुन्हा आता जीवनाची गाडी ऑनलाइन टू ऑफलाइन बनत आहे. कारण, आमच्या (भारतीयांच्या ) विशेषत: शिक्षक-विद्यार्थी यांच्या शरीरात डीएनए हे ऑफलाइनचेच रुजले आहेत. त्याप्रमाणे परीक्षा ऑफलाइन झाल्या, तरी बहुपर्यायी होतील,' भूमिकेतूच प्रा. डॉ. सुनिल पाटील यांची ही लिखाणनिर्मिती आहे. मुद्रितस्वरूपात ३७५ पेक्षा अधिक बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहेत. या छोट्याशा पुस्तिकेचे वाचन विद्यार्थी, परीक्षार्थी, स्पर्धा परीक्षांसाठीचे उमेदवार एखाद्या तासाभरात करेल. प्रा. पाटील यांनी प्रश्नांचे उत्तर गडद (बोल्ड) करून नोंदविले आहे. विद्यार्थ्यांनी सतत सतत याचे वाचन केले, तर निश्चित स्वरूपात विद्यार्थ्यांना ऑनलाइन-ऑफलाइन एक्झाममध्ये उत्तम गुण मिळतील, ही आशा करावयास हरकत नाही.