अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास गणित भाग २
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी ठरवून दिलेल्या द्वितीय वर्ष बी.एड. अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक परिपूर्ण आहे. त्यामुळे या विषयाच्या अध्यापकाचार्यांबरोबरच विद्यार्थी शिक्षकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. विद्यापिठाने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांत Choice Based Credit System (CBCS) चा अवलंब करण्यात आला आहे. त्याचबरोेबर २०१९-२० पासून वार्षिक परीक्षा पद्धती (Yearly Pattern) स्विकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिने अभ्यासक्रमाचे अध्यापन करणार्या अध्यापकाच्या दृष्टीने व एकूणच परिक्षांचे संचलन करणार्या विद्यापिठाच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येईल.