क्षेत्रकार्य प्रशिक्षण आणि समाजकार्याची कौशल्ये
समाजकार्य अभ्यासक्रम अंतर्गत क्षेत्रकार्य हे समाजातील विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास करीत असतांना प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना समाजकार्यचे कौशल्ये आणि ज्ञान व्यवहारात लागू करण्याची संधी देते. समाजकार्य सिद्धांत आणि ज्ञानव्यवहारात लागू करण्याची क्षेत्रकार्य ही एक प्रक्रिया आहे. क्षेत्रकार्य हे व्यावसायिक समाजकार्याचा आत्मा मानले जाते आणि हे भविष्यातील मोठ्या कामाच्या सरावाचा पाया मजबूत करण्याच्या काही मार्गांवर/दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्वाचे आहे. क्षेत्रकार्य हे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेले त्यांचे सैद्धांतिक ज्ञान वेगवेगळ्या व्यावहारिक परिस्थितींमध्ये योग्यरित्या लागू करण्याची संधी प्रदान करते. विशिष्ट कौशल्ये आणि तंत्रांद्वारे ज्ञानाचे कृतीत रूपांतर करण्याचा हा एक मार्ग आहे. क्षेत्रकार्यवरील सदर पुस्तकात विद्यार्थी, पर्यवेक्षक, संस्था पर्यवेक्षक आणि प्लेसमेंट एजन्सीसाठी आवश्यक असलेली सर्व संबंधित माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा समाजकार्य शिक्षण क्षेत्रातील अनुभव, ज्ञान व विद्यार्थ्यांना व्यावसायिक समाजकार्यकर्ते म्हणून यशस्वी होण्याबाबत असलेली त्यांची महत्वाकांक्षा याची परिणीती म्हणजे हे पुस्तक होय.