ग्रामोन्नतीचा राजमार्ग मायभूमीचे कर्मयोगी ग्रामभास्कर
पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा परिचय असतो परंतु यात जरा बदल करुन मी प्रिय वाचकांशी आणि विशेषत: ग्रामविकासासाठी, राजकीय नेतृत्वासाठी इच्छुक असलेले भावी कर्मयोगी यांच्याशी संवाद साधतो. यासाठी तीन प्रश्न पहिला : मायभूमीचे कर्मयोगी कोण होऊ शकतात? दुसरा : मायभूमीचे कर्मयोगी काय करू शकतात? तिसरा : ग्रामपंचायतीचा विकास व्हावं असं प्रत्येकाला वाटतं मग प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास का नाही? यांचं सर्वांचं उत्तर पुस्तकातील पुस्तकातील गावासाठी काय काय सुचायला हवं? असं सुचवणारे आणि प्रसंगी रोखठोक सुनावणारे मायभूमीचे कर्मयोगी मा. ग्रामभास्कर म्हणजेचं आदर्श पाटोदा गावाचे आदर्श सरपंच आदरणीय श्री. भास्करराव शहाजी पेरे पाटील यांनी प्रगतीसाठी शिक्षण नाही इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. हे आपल्या कृतीतून दिलेले आहे. ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि अधिकार यांची विस्तृत माहिती मी मायभूमीचे कर्मयोगी या पुस्तकाच्या रूपाने मांडली आहे. एक सामान्य माणूस काय काय करू शकतो? आणि सरपंचांचे अधिकार, कर्तव्य आणि ग्रामपंचायतीची प्रगतीची स्थिती-परिस्थिती आणि गती -प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहून विकासात्मक दृढनिश्चय केल्यास मार्गातील सर्व अडथडे कसे बाजूला होतात. त्याचाच शब्दप्रपंच मी मांडला आहे. त्यांच्या प्रमाणे मायभूमीचे कर्मयोगी, सहयोगी ऊब, ऊर्जा किंवा प्रेरणा देणारे नक्कीच व्हावे. हिच मनोकामना..!
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र जिजाबराव देसले,