राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी बहुविद्याशाखीय शिक्षण
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी उपक्रम आणि सहभाग या मुद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कृती पर्यावरण क्लब समाजसेवा इत्यादीमध्ये सहभागी होणाच्या विविध संधी मोठ्या प्रमाणात दिल्या जातील असे स्पष्ट म्हटले आहे. या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग असेल किंवा विद्यार्थी विकास मंडळ असेल तसेच जे काही सॉफ्ट स्किल अंतर्गत उपक्रम असतील अशा सर्व विभागांना अधिकाधिक प्रमाणात प्रोत्साहित करणे. प्रेरित उत्साही आणि सक्षम शिक्षक हा कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेच्या यशाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याचाही फार मोठ्या गंभीरपणे विचार केला आहे. तरीही प्राध्यापकांनी देखील आपल्या विषयाच्या बाबतीत परीपूर्ण असणे आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रंथालय तसेच संशोधन यावर भर देणे गरजेचे आहे.
- प्राचार्य डॉ. जी. एच. जैन