आदिवासी मावची जमातीचे लोकगीते
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आदिवासी राहतात. त्यात खास करून मावची समाज हा नंदुरबार जिल्ह्यांतील नवापूर व धुळे जिल्ह्यांतील साक्री या तालुक्यात राहतो. या समाजामध्ये लोकगीतांची रूढी निर्माण झालेली दिसते. ती लोकगीते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे केला आहे.
लोकगीते मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जात असतात. ती संगीतबद्ध असतात, संगीताच्या तालावर गायली जातात. मावची लोकगीते हे ढोलवाद्याशी निगडित आहेत. ती ढोलवाद्य वाजवून, तालासुरात गायली गेली आहेत. ते आपल्यासमोर या ग्रंथरूपाने सादर केले आहे. लोकगीतांमध्ये सामान्य माणसाची अभिव्यक्ती दडलेली असते. मावची आदिवासी समाज जंगलात दर्या-खोर्यात, सपाटी प्रदेशात राहतो. झाडे-झुडपांशी त्यांचे एक घनिष्ठ नाते जोडले गेले आहे. त्यामुळे तो जंगलाचा राजा म्हटला गेला आहे. निसर्गाशी तो हितगुज करतो व एक कृतज्ञतेची भावना लोकगीतातून व्यक्त करतो. तेच लोकगीतांमधून संशोधन करून ‘आदिवासी मावची जमातीची लोकगीते’ या ग्रंथामध्ये मांडली आहेत.