अंतराळ एक न सुटलेले कोडं
‘लेखकाचे लेखन हे नेहमी संवादित असावे, म्हणजे लेखक वाचकांसमोर बसून बोलतो, असे वाटले पाहिजे,’असे मी ऐकले होते. ‘अंतराळ ... एक न सुटलेलं कोडं...’ या पुस्तकाच्या लेखनातून मी तसे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात आले असेल की, ब्रह्मांड किती अचंबित करणारे आहे. ‘अंतराळ’ हे खरोखरच एक न सुटलेलं कोडं आहे, हे विश्व प्रचंड मोठं, अनादि आणि अगम्य आहे. अंतर्मुख होऊन एकाग्रतेने निसर्गाकडे बघितल्यास, समजून घेतल्यास ते तितकेच मनोहारी, मार्गदर्शक आणि समजण्यास सोपे आहे; परंतु त्यासाठी प्राथमिक माहिती आपल्याकडे हवी असते. ती या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. अंतराळ, एक कोडं असले तरी ते उकलण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विश्वाचा उगम कसा झाला इथपासून ते आपल्या पृथ्वी-चंद्रापयरतचा हा अंतराळ प्रवास विश्वाच्या विविध अंतरंगांचे वेध घेताना दिसतो. विश्वाच्या विविध घटकांची सचित्र माहिती मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तकात काही नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरणही श३य तित३या सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे.