डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल
संपूर्ण विश्वाच्या पसार्यात स्त्री अस्तित्वाची नोंद, स्वाभिमान, अस्तित्व, सन्मान, समानता या नैसर्गिक तत्त्वानुसार प्रतिष्ठापित होणे, ही मानवी विवेकवादी विचारांची महत्त्वपूर्ण मांडणी आहे. तथापि, संपूर्ण विश्वातील आंदोळणार्या टप्प्यांमध्ये विविध व्यवस्था प्रवाहांनी स्त्रीला विषमतेच्या गर्तेत, तसेच अन्याय-अत्याचार व गुलामीच्या जोखडात बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सर्व पाशातून मुक्ततेसाठी आपल्या प्रज्ञावंत, टोकदार लेखणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचा स्वाभिमान अस्तित्वाचा आणि मुक्ततेचा स्त्रोत प्रभावीपणे रुजविलेला आहे. संपूर्ण विश्वाला व त्यातल्या व्यवस्थेला कार्यप्रवण बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या लेखणीतील समतेचे बीज मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचे ठरते. डॉ. विजय घोरपडे यांच्या संशोधनातील विविध ऐतिहासिक प्रवाहांचा धांडोळा घेताना मुक्ततेचा श्वास घेत प्रवास करणारी स्त्री डॉ. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाने कशी सक्षम होते, याबाबतीत मार्मिकता दृश्यमान होते. त्यामुळे या ग्रंथास माझ्या शुभेच्छा...!
- प्रा. डॉ. म. सु. पगारे,आंबेडकरी विचारवंत