शोध शिक्षणासह माणसांचा
शोध शिक्षणासह माणसांचा
शोध शिक्षणासह माणसांचा
शोध शिक्षणासह माणसांचा

शोध शिक्षणासह माणसांचा

  • ISBN : 978-81-19118-28-1
  • Author : चंद्रकांत भंडारी
  • Edition : 3 July 2023
  • Weight : 135
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 120
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,
156 195 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR शोध शिक्षणासह माणसांचा

ADD A REVIEW

Your Rating

शोध शिक्षणासह माणसांचा

 एक अनुभव

मातीकामात तरबेज असलेल्या त्या १२ वर्षांच्या लेकराने यंदा गणपतीबरोबर दोन हत्ती बनविले. ते खूप सुंदर व जिवंत असल्यासारखे त्याने तयार केले. अर्थात त्यामागे त्याची तीन वर्षांची मेहनत होती.

वडिलांच्या हाताखाली मातीकामात तरबेज झालेल्या त्या लेकराने ते दोन्ही हत्ती गणेश विसर्जनानंतर आपल्या छोट्याशा घराबाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर ठेवले.

आई म्हणाली होती, ‘नको ठेवूस... तुटतील, कुणीतरी घेऊन जाईल.’ लेकराने ऐकलं नाही. पण दररोज रात्री तो ते दोन हत्ती, प्रार्थना वगैरे करत घरात आणायचा व सकाळी पुन्हा प्रार्थना, पूजा करत दरवाज्याच्या दोन्ही बाजूस ते दोन हत्ती एकेक करून ठेवायचा, मगच शाळेत जायचा.

शाळेत जेव्हा मास्तरांना हे कळलं तेव्हा ते त्या लेकराला म्हणाले, ‘कशासाठी ठेवतोस रे तू ते दोन हत्ती दररोज दरवाज्याजवळ.’

लेकरू शांतपणे म्हणाला, “सर, ते हत्ती सरळमार्गी असतात. आत्मशक्तीचे ते प्रतीक आहेत. हत्ती आपल्या कुटुंबियांची खूप काळजी घेतात. ते दयाळू असतात. हत्तीण कळपाची पुढरी असते व ती सर्वांना छानशी सांभाळून घेते. आमच्या घरात पण आम्ही एकमेकांना सांभाळून घेत आनंदानं राहतो. आई व आम्ही सारे घरासाठी कष्ट करतो. आम्हाला हे बळ या हत्तींकडून दररोज मिळतं म्हणून ते आमचे सच्चे मित्र... ऋीळशपवी!”