प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन
आज संपूर्ण जगसामोरे अग्रस्थानी असलेली समस्या म्हणजे ‘पाणीसमस्या’ होय. सृष्टीने माणसाला भरपूर दिले आहे परंतु या माणसाचा अतिलोलुप स्वभाव, व हव्यास यामुळे सृष्टीने दिलेली साधनसंपत्ती आज पुरेशी होत नाही. पर्यावरण असंतुलन, प्रचंड लोकसंख्या विस्फोट, तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर, भोगवादी वृत्ती, या कारणामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती पुरेनाशी झाली आहे. मानवी मुलभूत गरजांमध्ये ‘पाणी’ हे महत्त्वाचे आहे; पण आज पाण्याचे दुर्भिक्ष संपूर्ण जगात आढळते. आजच यावर उपाययोजन केले नाही तर पाण्यासाठी भीषण संकटाला सामोरे जावे लागेल म्हणून प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून पारंपारिक जलसंरक्षण,नियोजन,व्यवस्थापन याचा अभ्यास करून आज त्याचा उपयोग कसा करता येईल या विषयीचे चिंतन करणे क्रमप्राप्त आहे. भारताला हजारोवर्षांचा इतिहास आहे; इतकेच नव्हे तर विपुल साहित्य देखिल उपलब्ध आहे; किंबहुना कही पुरातत्वीय पुरावे देखिल आहेत. या अनुषंगाने प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे नैसर्गिक सोपे उपाय आज देखील उपयुक्त पडू शकतील यात शंका असण्याचे काही कारण नाही. आधुनिक काळात पचीन जलव्यवस्थापणाचा उपयोग होतो का? या उद्देशाने ‘प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन’ जाणून घेण्याची आजच्या काळाची नितांत गरज वाटली.