मानवी भूगोल
भूगोल ही विज्ञानाची महत्त्वाची शाखा मानली जाते. प्राचीन काळापासून या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाच्या विकासाबरोबरच या विषयाची व्यापकता वाढत गेली. भूपृष्ठाच्या भिन्न गुणवैशिष्ट्ये याचे अचूक सुसंगत व तर्कशुद्ध विवेचन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषय ओळखला जाऊ लागला. सुरुवातीला फक्त प्राकृतिक घटकांवर प्रकाश टाकला जायचा. नंतर मात्र मानवी घटकांचा या विषयात समावेश झाला. परिणामी भूगोल विषयाच्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या. प्राकृतिक भूगोलात प्रकृती घटकांचे शास्त्रीय वर्णन केले गेले. तर मानवी भूगोलात मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय वर्तनाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व बी. ए. च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून ‘मानवी भूगोल’ या पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे. मानवी भूगोल या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानवी भूगोल हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.