स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण
पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले आहे. आपल्या मराठी भाषेतील शब्दांच्या शुद्ध रुपांचा विचार म्हणजे तिचे व्याकरण होय. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीट नेटके, व्यवस्थित, आकर्षक व शुद्ध असावयास हवे. यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार लावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दालने खुली व्हावीत. त्याचबरोबर त्यांचे मराठी व्याकरण अधिक चांगले व्हावे यासाठी हा ग्रंथ विद्यार्थ्यांना रोजगाराची कवाडे खुली करणारा आहे. या ग्रंथात सारांश लेखन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, म्हणी, वाक्प्रचार, शब्दांच्या जाती, शब्दसिद्धी, संधी, समास या घटकांच्या आधारे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व विद्यार्थी स्पर्धापरीक्षांना मराठी विषयात जास्तीत जास्त संख्येने यश मिळवतील, असा विश्वास वाटतो.
- प्रा. डॉ. किशोर एन. • सोनवणे