सुलभ मराठी व्याकरण
भाषा आणि व्याकरण हे परस्परावलंबी आहेत. त्यामुळे भाषेचे जे घटक आहेत तेच व्याकरणाचेही घटक असतात. भाषेत वर्ण, शब्द, वाक्य इत्यादी घटक असतात. भाषा सिद्ध होण्यासाठी या सर्वांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे व्याकरणातही या सर्व घटकांचा विचार केला जातो म्हणून व्याकरणात वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार हे घटक महत्त्वाचे मानले जातात. ‘सुबोध मराठी व्याकरण’ हे पुस्तक सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्यांना मराठी भाषेचे स्वरूप, भाषेची घटना, विविध भाषिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि पुढील अभ्यासासाठी मदत होईल, हे नक्की!