आधुनिक मराठी वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ इतिहास
कोरोना काळात अनेक विद्यार्थी अस्वस्थ होते. त्यातूनच मराठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिका २१ मे २०२० ते १९ ऑक्टोबर २०२० या काळात चालविण्यात आली. इसवी सन १८१८ ते २०१८ या दोनशे वर्षांच्या काळात आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासात ज्या काही ठळक घडामोडी घडलेल्या आहेत, त्यासंबंधी मालिका चालवीत असताना कालखंडानुसार प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला गेला. या मालिकेत निबंध, नाटक, कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, विनोदी वाङ्मय, ललित गद्य व व्यक्तिचित्रे इत्यादी वाङ्मयप्रकारांचा समावेश करण्यात आला. सदरील ग्रंथ सेट, नेट, यूपीएससी, एमपीएससी, एम. फिल, पीएच. डी., तलाठी व ग्रामसेवक अशा विविध स्पर्धा परीक्षांतील मराठी विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरेल असे वाटते.