प्राचीन मराठी वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ इतिहास : आरंभ ते १८१८
मराठी विषयातील पेट, सेट, नेट यांसारख्या परीक्षांप्रमाणेच मराठी विषय निवडून केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ म्हणजे एकाअर्थाने पायाच आहे. महाराष्ट्रातील वर्ग तीन आणि चार संवर्गातील पदभरतीसाठी होणार्या परीक्षेत मराठी वाङ्मयाच्या इतिहासातले काही प्रश्न अपरिहार्य असतात. आता सर्वच स्पर्धा परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात होत आहेत.प्राचीन मराठी वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ इतिहास : आरंभ ते १८१८ या ग्रंथात 1450 प्रश्न बहुपर्यायी असून, 260 प्रश्न चूक किंवा बरोबर विधान ओळखण्याबाबत आहेत. 144 प्रश्न योग्य जोड्या जुळवण्याविषयी आहेत.