वैदिक गणित मॅथ प्रोजेक्ट ६४ डे पार्ट १
कोणत्याही पुस्तकाचे किंवा ग्रंथाचे लिखाण म्हटले म्हणजे त्यासाठी लागणारी आंतरिक प्रेरणा व आपल्याला मिळालेली बाह्य प्रेरणा अतिशय महत्त्वाची असते. दैनंदिन जीवनात शालेय वातावरणात गणित हा अवघड वाटणारा विषय सोपा वाटण्यासाठी व कमी कालावधीत लवकरात लवकर मनोरंजकरीत्या गणित सोडविण्यासाठी सोप्या व सुटसुटीत भाषेत या पुस्तकात सूत्रे दिलेली आहेत. या पुस्तकात गणिती प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच गुणाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, बेरीज, वजाबाकी, भागाकार यांचा सविस्तर सूत्रनिहाय स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय प्रत्येक दिवसाचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्याला मागे उत्तरासह सूची दिलेली आहे. यात सराव केल्यानंतर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास आहे.