अंतःस्वर
अंतःस्वर

अंतःस्वर

  • ISBN : 978-81-968107-2-6
  • Author : शशिकांत हिंगोणेकर
  • Edition : 3 January 2024
  • Weight : 90
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 72
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कविता,
120 150 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR अंतःस्वर

ADD A REVIEW

Your Rating

अंतःस्वर

हायकू हा एक परकीय काव्यरचनाप्रकार आहे. जपानी भाषेची चित्रमयता आणि तिचे अल्पाक्षरत्व यांमुळे या अल्पाक्षरी रचनाप्रकाराला जपानी साहित्यात सहजतेने महत्त्व प्राप्त होत गेलेले दिसते. हा रचनाप्रकार मराठीत येऊन आता बरीच वर्षे झालेली आहेत, तरी तो मराठी काव्यरचनाप्रकारांमध्ये आपले महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठीतील सौंदर्यलक्ष्यी जाणीवेच्या कवींच्या भाववृत्तीला अनुकूल असणारा रचनाप्रकार म्हणून हायकूचे मराठी काव्यसंस्कृतीतील स्थान लक्षात घ्यावे लागते. मात्र सन १९७०-७५च्या सुमारास मराठीतील सौदर्यलक्ष्यी जाणीवेच्या -हासपर्वात हायकू हा रचनाप्रकार परिचित होत गेला. नव्वदोत्तरी कालखंडात भावकेंद्री कवितेकडून वास्तवकेंद्री कवितेकडे मराठी कवितेचा अक्ष अधिकाधिक झुकत गेल्यावर तर हायकू या स्वभावतःच भावकेंद्री रचनाप्रकाराची पिछेहाट होणे स्वाभाविकच होते. असे असूनही आजच्या घडीलाही हायकू हा काव्यरचनाप्रकार हाताळण्याची ऊर्मी आणि असोशी बाळगून असलेल्या कवींच्या अशा रचना अधूनमधून आपल्याला वाचायला मिळतातच. आपल्या भाववृत्तीच्या आत्मनिष्ठ अभिव्यक्तीसाठी कदाचित कवींना हायकू हा रचनाप्रकार जवळचा वाटत असावा.

कवी शशिकांत हिंगोणेकर हे मूलतः जीवनवास्तवाची कविता लिहिणारे कवी आहेत. त्यांचा 'छलचक्र' नंतरचा पुस्तकरूपाने येणारा 'अंतःस्वर' हा दुसरा हायकूसंग्रह निसर्गसंवेदन आणि मानवी भावभावनांची निर्भरशीलता यांच्या वैविध्यपूर्ण छटांनी सजलेला आहे. हा कवितासंग्रह ह्या कवीच्या जीवनजाणीवेचे व्यापकपण आणि आत्मशोधाची निकड अधोरेखित करणारा आहे. 'अंतःस्वर' हे त्याचे शीर्षक या अंगाने बोलके आहे. खुरटलेला निसर्ग आणि बोथटलेल्या भावभावना यांनी घेरलेल्या शुष्क, निरस अशा आंतरिक आणि बाह्य भोवतालात जगण्याची सक्ती असलेल्या समकालीन मानवी मनांच्या संवेदनशीलतेला साद घालणारे हे हायकू आहेत. काव्यभाषा, शब्दनिवड, चपखल व नाविन्यपूर्ण प्रतिमा, ऐंद्रिय अनुभूती या अंगांनी संपन्न असणारी ही रचना कवीच्या काव्यप्रतिभेला उजाळा देणारी आहे. मराठी कवितेचा एक चित्तवेधक आविष्कार म्हणून ह्या संग्रहातील हायकू लक्ष वेधून घेतात.