मराठी विज्ञान साहित्य सद्यःस्थिती आणि मूल्यमापन
१९६० नंतरच्या कालखंडातील विविध मराठी साहित्यप्रवाहांचा विचार करता, त्यातील अलीकडचा साहित्यप्रवाह म्हणजे विज्ञान साहित्य. मराठीतील विज्ञान साहित्याची पार्श्वभूमी पाहता १९ व्या शतकात विज्ञानविषयक माहिती देण्याच्या हेतूने लेखन झालेले दिसून येते; परंतु ही माहिती शास्त्रीय आणि माहितीवजा पद्धतीची होती. मानवी जीवन विज्ञानलेखनात येण्यास २० व्या शतकाच्या आरंभी सुरुवात झाली. १९६० नंतरच्या कालखंडात मराठीत झालेले विज्ञान साहित्याचे मोठ्या प्रमाणातील लेखनामुळे मराठीत विज्ञान साहित्याचे नवे दालन उघडे झाले. साठोत्तरी मराठी वाङ्मयीन प्रवाहांचा विचार करता विज्ञान साहित्य विकसनशील असा साहित्यप्रकार आहे. त्यात बदल आणि विकासाला वाव प्रचंड आहे. मराठी विज्ञान साहित्याच्या समीक्षेच्या प्रांतात मराठी विज्ञान साहित्याच्या समीक्षेची वानवा आहे हे सर्वश्रुत आहे. हा अभाव दूर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मराठीतील विज्ञान साहित्यावरील 'मराठी विज्ञान साहित्य : सद्यःस्थिती आणि मूल्यमापन' हा संदर्भग्रंथ प्रकाशित करीत आहोत. याचा संशोधक-अभ्यासकांना उपयोग नक्कीच होणार आहे.