आहार हेच गुणकारी औषध
'आहार हेच गुणकारी औषध' या पुस्तकातील बहुतांशी माहिती पिढ्यान्पिया उपयोगात येण्यासारखी आहे. विविध जेष्ठ नागरिक, संस्था व व्यक्तींच्या मार्फत आहार हेच गुणकारी औषध याद्वारे सात्विक आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली बद्दल प्रचार, प्रसार होवून मधुमेहावर व इतर आजारांवर नियंत्रण करणे सोपे होईल.
ज्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. असे पदार्थाचे जास्त सेवन केल्याने मधुमेह नक्कीच आटोक्यात येईल याची खात्री आहे. अनेक पुस्तके, गुगल, युट्यूबवरुन त्यांनी माहिती जमा केली आहे व वाचकांसमोर ठेवली आहे. त्याच बरोबर उतारवयात काम कमी आणि खाण्याचे प्रमाण आहे तेवढेच असल्याने लठ्ठपणा, पोटाचा आकार वाढणे, वजन वाढणे या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याकरीता कमी कॅलरीज असलेले पदार्थांचे सेवन जास्त केल्यास लठ्ठपणा, पोटाचा आकार, वजन वाढणे या समस्या देखील आपोआपच कमी होवून आपण म्हातारपण आनंदाने जगू शकतात.
- डॉ. सुरेश शामराव पाटील
अध्यक्ष, आय. आर. डी. एस. एस., जळगाव