पुन्हा एकदा
नवनव्या कल्पना आपल्या साहित्यातून मांडणारा कवी, लेखक पुढच्या पिढ्यांसाठी एक वाट निर्माण करीत असतो. ही वाट समृद्ध असावी यासाठी लेखक, कवींनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक निसर्गपर जाणिवा ह्या प्रगल्भ केल्या पाहिजेत. अशा प्रगल्भ जाणिवेच्या कवयित्री आयुष्यमानिनि गीता अरविंद मदारे यांचा ‘पुन्हा एकदा’ हा कवितासंग्रह भान जपणारा आणि माणसाच्या माणसुकीला जोपासणारा असाच आहे. त्यांच्या कवितेचा आशय हा सर्वसमावेशक जरी असला तरी त्याचा केंद्रबिंदू हा माणसाच्या जगण्याशी निगडीत असाच आहे. त्यांच्या कवितेचा आशय हा सर्वसमावेशक जरी असला तरी त्याचा केंद्रबिंदू हा माणसाच्या जगण्याशी निगडीत असाच आहे. खर्या अर्थाने ज्याच्यासाठी लिहलं जातं अर्थातच त्याच्या वास्तवाचं भान लेखक, कविला आलंचं पाहीजे जे निश्चितपणे कवयित्री आपल्या लिखाणात अवलंबतात. मनातली भावभावना सार्वजनिक स्वरुपात मांडण्याचे, अनुभवांचे संचित मांडण्याचे कविता हे एक माध्यम आहे, हे वास्तव आहे.