भंगारातील लॉटरी
'भंगारातील लॉटरी' हा कथासंग्रह लिहिण्यासाठी माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद लाभले. त्यांच्या प्रेरणेने, पुण्याईने हा कथासंग्रह आकाराला आला. माझ्या कथा संग्रहात दहा कथा असून विशेष म्हणजे मी ग्रामीण जीवनात, खेड्यातील जीवनात काही काळ वास्तव्य केले आहे. येथील जीवनाच्या व्यथा, वेदना, दारिद्र्य याचे चटके सोसले, अनुभवले आहेत. ह्या संग्रहातील सर्वच कथांना वास्तवाची, अनुभूतीची, प्रवासाची किनार लाभली आहे. ह्या कथा कपोलकल्पित नाही, कोणाचेही अनुकरण केले नाही, एका तटस्थ आणि साधनेच्या कुशीतून ह्या कथा साकारल्या आहेत. या कथा-कथांच्या साच्यात उतरतात किंवा नाही, हे वाचक व समीक्षकांनी ठरवावे. ह्या कथेतील पात्र, प्रसंग, घटना या ग्रामीण जीवनाशी, भागाशी निगडित आहेत. मी ग्रामीण संस्कृतीत जीवनात अनुभवले तेच कथा लेखनात झिरपले आहे, चितारले आहे.